Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ३० जानेवारी : गडचिरोली पोलीस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलीस शिपाई हिने रात्रीच्या १०.३० वाजताच्या च्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिला पोलीस शिपाईचे नाव प्रणाली काटकर (३५) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिला पोलीस शिपाई गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षापासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलीस शिपाई संदीप पराते  यांच्याशी दोन वर्षा आधी झाले  असून ते सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. मृतक महिला पोलीस शिपाई ही संदीप पराते यांची दुसरी पत्नी आहे. या दोघांत सातत्याने वाद होत असल्याने काल दिनांक २९ जानेवारी रोजी कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने मृत महिला पोलीस शिपाईने टोकाची भूमिका घेऊन विष प्राशन केले.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी पती संदीप पराते यांना पत्नी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच उपचारार्थ शासकीय रुग्णालय गडचिरोलीत हलविण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले. सदर घटने ठिकाणी रात्रीच्या वेळीच गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी रुग्णालयात पोहोचून अधिक तपास सुरु असून आज दिनांक ३० जानेवारी ला शवविच्छेदन करण्यात येत आहे.

सदर महिला पोलिस शिपाईने आत्महत्या केल्याने पोलीस वसाहतीत सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. तर सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कातलाम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोऱ्हे करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

 

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.