Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई दि. ०९ नोव्हेंबर  : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या आरोपावरुन दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेन्द्र फडणवीस दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत १९९३  च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली. त्या जमीनीचा दुसरा एक भाग शाह वली खान यांच्या नावाने आहे. या दोघांनी जवळजवळ तीन एकरची जागा सॉलिडस या नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीनं त्याच्यावर सही केली ती फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबाकडे आहे. स्वत: मलिक काही काळ या कंपनीवर संचालक राहिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॉलिडसला ही जागा केवळ ३०  लाखात विकली गेलीय. मलिक या कंपनीत २०१९ पर्यंत होते.

नेमका प्रकार असा आहे २००३ मध्ये व्यवहार २००५ ला संपला तेव्हाम मलिक मंत्री होते. तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? आणि असं काय होतं की एवढी महागडी जमीन तुम्हाला २० लाखात मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी प्रॉपर्टी जप्त होते. त्यामुळेच यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही ना, यात सरळ अंडरवर्ल्डसोबत संबंध दिसून येतो, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

दोन सापांना हातात पकडून फिरणारा माथेफिरू…

भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !

Comments are closed.