Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकटीव्हीच्या CEO ला अटक; मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त

टीआरपी घोटाळ्यासंबंधी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, विकास खानचंदानी यांची या आधीही चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज विकासला मुंबई पोलिसांनी अटक केली. तसेच टीआरपी घोटाळ्या प्रकरणी पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. त्यावर 7 डिसेंबर रोजी या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही  फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.

( हे वाचा – पत्नीसाठी काहीही …पोलीस अधिकारी असल्याचे पत्नीला भासविणाऱ्या तोतयाला पोलिसांनी केली अटक)

Comments are closed.