Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठलाय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

इस्लामाबाद डेस्क 12 मार्च:- पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठलाय. महागाईच्या वणव्यात होरपळणारी जनता अगदी त्रासून गेलीय. सर्व सामान्य नागरिकांना स्वयंपाक करणं देखील अवघड झालंय. पाकिस्तानमध्ये कोंबड्या आणि मांसाची किंमत अचानक वाढलीय. त्यामुळे लोक पंतप्रधान इमरान खान यांना लक्ष्य करत आहे. मांसाशिवाय अंडे आणि आल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. रावळपिंडीत अंड्याच्या किमती 350 रुपये प्रति डझन झाल्यात, तर आल्याची किंमत 1000 रुपये प्रति किलो झालीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाकिस्तानमध्ये कच्चा माल आणि चाऱ्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोंबड्या आणि अंड्याच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. सध्या पोल्ट्री चालकांचा खर्च अधिक होत असल्याने किमती वाढल्या आहेत. काही दिवसात या किमती कमी होतील असा दावा स्थानिक विक्रेत्या संघटनांनी केलाय.

पाकिस्तानमधील महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे इमरान खान साखरेचे दर 102 रुपयांवरुन 81 रुपये केल्याचं श्रेय घेत स्वतःच्या सरकारचं कौतुक करण्यात गुंग आहेत. त्यामुळे अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार हाच प्रश्न आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.