Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाची स्थिती, सततचे लॉकडाऊन त्यामुळे अभ्यासक्रमाचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीच्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथील डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने आपल्याच घरी गळफास लावून आत्महत्या केली. हि घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्नेहा भिवाजी हिचामी (वय २१, रा. घोट) असे मृत युवतीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २.०० च्या सुमारास स्नेहाने आपल्या घराला लागून असलेला रिकाम्या खोलीत पंखा लटकवायचे हुकला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन तिने अखेरचा श्वास घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्महत्येपूर्वी स्नेहाने खोलीतील भिंतीवर डिप्रेशन असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. यावरून तिला नैराश्य आले होते. पण हे नैराश्य नेमके कशामुळे हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोरोनाची स्थिती, सततचे लॉकडाऊन त्यामुळे अभ्यासक्रमाचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने तिला हे नैराश्य आले याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्नेहा चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील पोलीस विभागात कर्मचारी असून घरात आई व एक भाऊ असा तिचा परिवार आहे. अभ्यासात हुशार, होतकरू आणि मेहनती मुलीच्या जीवनाचा अंत अशाप्रकारे झाल्याने तिच्या परिवारांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावातही सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कोरोना काळात बँकांचा वेळात बद्दल ; काय आहे बदल इथे वाचा सविस्तर

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

Comments are closed.