Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास तुर्तास स्थगीती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २९ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यामुळे मागील ११ दिवसांपासून विद्यापीठ प्रशासनाचे कामकाज प्रभावीत झालेले होते.

दि. १८ डिसेंबर पासून गोंडवाना विद्यापीठातील कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच गोडवाना विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटना या दोन्ही संघटनांनी बेमुदत संप पुकारलेला होता. परंतु शासनासोबत कृती समितीच्या पदाधीकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे मंगळवारी अकराव्या दिवशी आंदोलन स्थगीत करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कृती समितीच्या निर्देशानुसार दि. २९ डिसेंबर रोजी विद्यापीठातील दोन्ही संघटनांनी अधिकृतपणे संप मागे घेवून अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असून संपातील १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे प्रभावीत झालेल्या कामकाजास सुरूवात झाली.
विद्यापीठातील ७९६ पदाला सातवा वेतन आयोग लागू करणे, आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत चालू करणे, सातवा वेतन लागू केलेल्या कर्मचा-यांची ५८ महिन्याची थकबाकी त्वरीत अदा करणे, विद्यापीठ कर्मचा-यांना पाच दिवशाचा आठवडा लागू करणे, शासन निर्णयानूसार तदर्थ पदोन्नती कर्मचा-यांना द्यावी, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अकृषि विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांची पदे भरण्यास मंजूरी देण्यात यावी, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ शासनाने लागु करावा, आदी मागण्या संदर्भात शासन दरबारी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे कृती समितीने कळविल्यामुळे कृती समितीच्या निर्देशानुसारच सुरू असलेले आंदोलन तुर्तास २० दिवसांकरीता स्थगीत करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांनी दिली.

आंदोलन मागे घेण्यासंदर्भात मा. कुलगुरू, मा. प्र-कुलगुरू यांना दोन्ही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, सचिव सतिश पडोळे, सहसचिव शाम कळसकर, अधिकारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजय सिलारे, उपाध्यक्ष जितेंद्र अंबागडे, सचिव डॉ. हेमंत बारसागडे तसेच आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

विवाहित महिलेची निर्घृण हत्या!

चाईल्ड लाईन, बाल सरंक्षण कक्षाने अवघ्या २ तासाआधी थांबविला बालविवाह…

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

 

Comments are closed.