Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने पालकांवर होणार कारवाई?

डोंबिवली वाहतूक विभागाची कारवाई !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

डोंबिवली, दि. २६ मार्च : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीत पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

डोंबिवलीत वाहतुक नियमांचे उलघणं करणाऱ्यावर वाहतूक विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. यातच आता १८ वर्षाखालील मुले सरार्स पणे वाहनचालवताना आढळून येत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामुळे वाहतुक पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत,त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी पाच हजारा ते दहा हजारा पर्यन्त दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.

तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे.आणि जे कोनी पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

 

 

Comments are closed.