Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेल्फीचा नाद नडला..पण सुदैवाने जीव वाचला

सेल्फी काढताना महिला पडली पुराच्या पाण्यात...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदुर्ग,  दि. ४  जुलै :  अती उत्साहीपणा हा नेहमी कसा घात करतो याचे किस्से आपण नेहमीच ऐकले असतील. परंतु सिंधुदुर्गातील आंबोली येथे मात्र अतिउत्साहीपणा एका महिलेच्या जीवावर बेतला होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावली आहे. आंबोली येथे नदीच्या काठावर सेल्फी काढताना थेट या महिलेचा तोल गेला आणि थेट ही महिला दुथडी भरून वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात पडली. यावेळी एका पोलिस जवानाने आपला जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवले.

कणकवली येथून आंबोली येथे सहलीसाठी गेलेल्या कुटुंबातील एक महिला गेळे येथील हिरण्यकेशी नदीपुलावर अगदी काठावर उभे राहून सेल्फी काढत होती. मात्र सेल्फी काढताना तीचा तोल गेल्याने ती थेट नदीच्या पुराच्या पाण्यात कोसळली. तन्वी दीपक शिंदे असे या महिलेचे नाव असून ती कणकवली येथील रहिवासी असून ती, पती आणि मुलासोबत फिरण्यासाठी आली होती. तन्वी या नद्दित पडल्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे ती प्रवाहासोबत ५०० मीटर झाडीझुडपातून वाहत गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी तिच्यासोबत तिचा पती व मुलगा होता. त्यांनी लगेच आरडा ओरड करत स्थानिकांना बोलावलं. याबाबतची खबर स्थानिकांना व पोलिसांना मिळताच आंबोली पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, अभिजीत कांबळे यांनी तात्काळ आंबोली आपत्कालीन रेस्क्यू टीमला कल्पना देत दोरी सह घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचले. त्यावेळी तन्वी या नदीपात्रात झुडपाला अडकल्याचे पाहताच दत्तात्रय देसाई यांनी जीवाची परवा न करता नदीत उडी घेतली आणि महिलेचे प्राण वाचवले. दत्तात्रय देसाई यांच्या धडासमुळे तन्वी यांचा जीव वाचला. त्यामुळे दत्तात्रय देसाई यांची सर्व स्तरातून कौतकाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

 

Comments are closed.