Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र संस्थेचे सभा, शिवारफेरी व जल व्यवस्थापन आराखडा कार्यक्रम आयोजित

बायफ संस्थेचे सभा व शिवारफेरी आणि आराखडा __ गाव होणार सुजलाम सुफलाम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२६ : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत देवलमरी अंतर्गत येत असलेल्या नंदीगाव येथे अतीप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र संस्थेचे सभा व शिवारफेरी आणि जल व्यवस्थापन आराखडा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष देवलमरीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके तर प्रमुख अतिथी म्हणून बायफचे क्षेत्रीय समन्वयक एस. बी. पटले,देवलमरीचे ग्राम विकास अधिकारी लाडे,मनरेगाचे सहायक कार्यक्रम अधिकारी नेहरू गोवर्धन, मनरेगाचे तांत्रिक अधिकारी नागेश सेनीगारपू, मनोज पडीशेलवार,बायफचे तालुका समन्वयक अतुल डोर्लिकर,वनरक्षक रेखा नरोटे ,मंगेश कुळे,उपसरपंच हरीश गावडे, सदस्य शशिकला मोहंदा बायफचे अल्का तलांडे,काजल मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अतुल डोर्लिंकर यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून सांगितले की, अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्पा अंतर्गत गावात लोकसहभागातून जल व्यवस्थापन करून पाण्याचा पातळी वाढविणे आणि शेती करिता पाण्याचे सुविधा निर्माण करून शेतकरी व गाव सुजलाम सुफलम करणे हेच बायफ संस्थेचे मुख्य उद्देश असून नंदीगाव येथील शेतकऱ्यांना शेततळे, सिंचन विहीर, बोडी, बांध बांधणे असे विविध कामे करण्यात येईल या करिता कामाचे आराखडा तयार करण्यात येईल असे सांगितले.

विकासात्मक कामे यशस्वी करण्यासाठी गावातील लोकसहभाग राहणे गरजेचे आहे. लोक सहभाग विना कामे पूर्णत्वास नेणे कठीण जाणार म्हणून आपल्या व शेतीचे विकासासाठी बायफ व मनरेगा विभागाला मदत करा आणि विकासात्मक कामे पूर्ण करून शेत सुजलाम सुफलम व आपला उन्नती करा असे अध्यक्ष स्थानावरून सरपंच लक्ष्मण कन्नाके बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि गावासभोवतल शिवारफेरी काढून शेतीचे व भौगोलिक क्षेत्राचे पाहणी करण्यात आले व पाच वर्षात घेण्यात येणाऱ्या कामाचे निवड करून आराखडा तयार केले.कार्यक्रमाचे संचालन रमेश बामनकर तर प्रास्ताविक अतुल डोर्लिंकर आभार प्रदर्शन रोजगार सेवक राकेश कुर्री यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता सामाजिक कार्यकर्ते संदीप दुर्गे, दिलीप मडावी, प्रमोद आत्राम, नागेश गावडे, बंटी गावडे, संतोष दहागावकर, राजू सिडाम,पवन मेश्राम, रोहित आलाम,सुधाकर आलाम, आनंद सिडाम, स्वप्नील तोरेम,विकास सोयाम,साक्षी गावडे, रंजना सिडाम, प्रकाश मडावी आदींनी सहकार्य केले.

हे देखील वाचा,

रानटी हत्तींचा उच्छाद! “त्या” रानटी हत्तीने घेतला तिसरा इसमाचा बळी..

“त्या” रानटी हत्तीच्या हल्ल्यात तीन महिला गंभीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.