Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आंमत्रित

दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सदर करण्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे विद्यार्थ्यांना आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता , इतर आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी दि.13 जून 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी/12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुळ जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 10वी/12वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या योजनेच्या दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल.दिव्यांग(अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे. तसेच अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, गडचिरोली यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार

जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

 

 

Comments are closed.