Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागेपल्ली येथील मुख्याध्यापक धीरज महंत यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व निरोप

लोकस्पर्श न्यूज  नेटवर्क,

 ” घेतांना आज निरोप शाळेचा, आले भरूनिया डोळे
शाळेतील दिवस बनले, स्मारणाच्या पुस्तकातील पाने ‘.‘ 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

अल्लापल्ली दि,४ एप्रिल : राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली येथील मुख्याध्यापक आदर्श, प्रामाणिक, कर्तृत्ववान, शांत, मनमिळावू,सुस्वभावी व्यक्तिमत्व धीरज महंत यांना शाळेमार्फत  सभागृहात सेवानिवृतीपर सपत्नीक निरोप देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक जाधव , प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य अर्जुन दाते  उपस्थित होते.या कार्यक्रमात जनार्दन झाडे , वैशाली भोंगळे , लांडगे , रामटेके यांनी आपल्या मनोगतातून महंत यांनी धर्मराव शिक्षण मंडळात विविध शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उत्तम व सहकार्याच्या भावनेतून कार्य केले असल्याचे भावना व्यक्त केले .

या कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला असून  आदरणीय महंत सरांना सेवानिवृत्तीच्या व भावी  आयुष्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी कडून खूप शुभेच्छा देण्यात आल्या.  कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक व आभार कु.अश्विनी लोखंडे यांनी केले.

हे देखील वाचा,

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल

गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखडा विषयक अभिप्राय

Comments are closed.