Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंत्ययात्रा काढून ‘या’ प्राणीप्रेमी शेतकऱ्याने कोंबड्याला दिला अखेरचा निरोप…

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील घटना; राजा नावाच्या कोंबड्याची सर्वत्र चर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. २७ जुलै : माणसाचे प्राणीप्रेम काही नवीन नाही, आपण समाजामध्ये बैल, कुत्रा, म्हैस,  इत्यादी पाळीव प्राण्यांची अंत्यसंस्कार पहिली असतील, पण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरमाळ येथील एका प्राणिप्रेमी शेतकऱ्याने लळा लावलेल्या राजा नावाच्या कोंबड्याची विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला निरोप दिला. यावेळी अंत्यसंस्कारात अनेक गावकरीही सहभागी होते.

दहा वर्ष मालकाला साथ देणाऱ्या राजा नावाच्या कोंबड्याला चार दिवसांपूर्वी मांजराने चावा घेतल्यानं कोंबडा जखमी झाला होता. या कोंबड्यावर बरेच उपचार करुन ही कोंबडा वाचला नाही. गावांत सर्वत्र स्वच्छंद हुंदडत असलेला हा कोंबडा गावकऱ्यांना अत्यंत प्रिय होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकांनी दिलेले भजे, मुरमुरे खात होता. सर्वांचा लाडका कोंबड्यावर मालक शंकर कोकलेचा लाडका होता. या राजाच्या अचानक जाण्यानं मालक आणि गावकऱ्यांना दुखः झालं. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत राजा या कोंबड्याची बँडबाजा लावून अंत्ययात्रा काढली.

शंकर कोकले यांच्या शेतात खड्डा तयार करुन विधीवत अंत्यसंस्कार केले. राजाच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या कोरोनामुळे रक्ताच्या नात्यातल्या लोकांच्या अंत्यविधीस जाताना दिसत नाही मात्र,  दहा वर्षांत गावकऱ्यांची मने जिंकणाऱ्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.

हे देखील वाचा :

आकाशवाणी केंद्रावर थेट मुलाखतीकरिता ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमा अंतर्गत कु. हर्षदा गोंगले विद्यार्थिनीची निवड

ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!

सी.आर.पी.एफ देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा, हा आज अभिमानाचा क्षण आहे:कमांडंट मोहनदास खोब्रागडे

 

 

Comments are closed.