Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू

बफर क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या हिरडी नाला परिसरात या वाघाच्या ४ बछड्याचे मृतदेह आज सकाळच्या सुमारास आढळून आले. मृत पिल्लांचे वय अंदाजे ३ ते ४ महिने असून मृत पिलांच्या अंगावर जखमा असल्याने परिसरात असलेल्या अन्य एखाद्या नर वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मात्र इतक्या छोट्या पिल्लांना त्यांची आई कधीच सोडून जात नसल्याने या पिल्लांची आई कोण, ती कुठे आहे, ती पिल्लांच्या जवळ का नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिकार झाली का? अशे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहे. वनविभागाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि आईची ओळख पटविण्यासाठी डीएनए (DNA) चाचणी केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या चार वाघ बछड्यांच्या (tiger cubs) मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने याचा  खुलासा केला आहे. एका मोठ्या वाघाने या सर्व चार बछड्यांना (cubs dead) मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून पायी गस्त करत या चार बछड्यांच्या माता वाघिणीबाबत माहिती घेतली जाणार आहे.  चंद्रपुरात 30 नोव्हेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात 14 ते 15 वर्ष वयाच्या एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. आज याच भागात गस्त घालणाऱ्या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना चार वाघ बछडे मृतावस्थेत आढळल्याने यातील गुंतागुंत वाढली होती.

व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीण मेलेल्या स्थानापासून तीन किलोमीटर हवाई अंतरावर हे चार बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत. 30 नोव्हेंबर रोजी वाघिणीच्या मृत्यूनंतर या भागात गस्त घातली असता हे चार बछडे फिरताना आढळले. मात्र त्यासोबत एक नर मोठा वाघ देखील कर्मचाऱ्यांना आढळून आला. मात्र आज सकाळी हिरडी नाला परिसरात या चारही बछड्यांचे थेट मृतदेहच आढळून आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बछड्यांवर नर वाघाचा हल्ला?

शवांची प्राथमिक चौकशी केली असता या छोट्या बछड्यांवर नर वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले आहे. सध्या या भागात दोन नर व एक पूर्ण वाढीची वाघीण यांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या बछड्यांची माता वाघीण कोण याबाबत सध्या स्पष्टता नाही. चारही बछड्यांचे शव चंद्रपूरच्या वन्यजीव सुश्रुषा केंद्रात आणण्यात आले असून पोस्टमार्टम नंतर डीएनएद्वारे या बछड्यांची माता वाघीण निश्चित होणार आहे. सध्या कॅमेरे ट्रॅप व पायी गस्त वाढवून या परिसरात या पिलांच्या मृत्यूनंतर एखादी वाघीण फिरताना आढळते का याचाही तपास प्रकल्पाच्यावतीने घेतला जात आहे.

हे देखील वाचा : 

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान

३,५०० रुपयाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

Comments are closed.