….एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ४ नोव्हेंबर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाच्या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात राज ठाकरे यांना एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणत्याही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.
दिवाळीच्या दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे. कोरोनो संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्यशासनात विलीन करा एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
"एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल."
मा. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. pic.twitter.com/OLaMXcXDMS
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2021
अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये सुरू आहे तिथंही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत या दिवाळीच्या दिवसात कर्मचार्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; दिवाळी निमित्ताने आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय जवानांसोबत साजरी केली दिवाळी
Comments are closed.