Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण आर्मी कमांडर यांनी प्रादेशिक सेना गृप मुख्यालय आणि अग्नीबाझ विभागाला भेट देवून कार्य सज्जतेचा घेतला आढावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. ९ जुलै : लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन,  यांनी आज ९ जुलै २०२१ रोजी पुणे येथील प्रादेशिक सेना गृप  मुख्यालय येथे भेट दिली आणि कार्य सज्जतेचा आणि विविध  कामांचा आढावा घेतला.

भेटीदरम्यान, प्रादेशिक सेना मुख्यालयाचे  कमांडर ब्रिगेडिअर एम. एस. सिद्धू यांनी आर्मी  कमांडर यांना त्यांच्या गट मुख्यालयाच्या विविध कार्यकारी आणि प्रशासकीय बाबींविषयी माहिती दिली. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील संवेदनशील भागात सुरक्षा प्रदान करण्यासह विविध राष्ट्रनिर्माण कार्यात  प्रादेशिक सेना (टीए) आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त, इकोलॉजिकल टीए बटालियन्स राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यांत वृक्षारोपण मोहिम राबवत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रेल्वे आणि तेल क्षेत्रातही प्रादेशिक सेनेच्या तुकड्या कार्यरत आहेत. युद्ध काळात  आघाडीवरील  भागात रेल्वे गाड्या चालवण्याची आणि युद्धाच्या वेळी तेलाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ते पार पाडतात. लेफ्टनंट जनरल नैन  यांनी  प्रादेशिक सेनेच्या सर्व तुकड्यांचे प्रशंसनीय कार्याबद्दल कौतुक केले.

त्यानंतर आर्मी कमांडर यांनी पुण्यातील अग्निबाझ विभागाला भेट दिली आणि त्यांच्या सज्जतेचा व्यापक आढावा घेतला. भेटीदरम्यान, आर्मी  कमांडर यांना  मेजर जनरल अनूप जाखड़, अग्निबाझ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग यांनी विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध परिचालन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांची माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आर्मी कमांडर यांनी सांगितले की अग्निबाझ विभाग दक्षिणेकडील शक्ती केंद्र आहे आणि त्यांनी  यशस्वीपणे आधुनिकीकरणाच्या मार्गावर वाटचाल  केली आहे. भविष्यातील कोणत्याही परिस्थितीत सामंजस्यपूर्ण आणि चोख प्रत्त्युत्तर  देण्यासाठी इतर लढाऊ सज्जता तसेच विविध संसाधनाशी समन्वय आणि सहकार्य राखण्यावरही  त्यांनी भर दिला.

कोविड -१९ मुळे उदभवलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसह प्रशिक्षणप्रति व्यावसायिकता आणि कटिबद्धतेचे  आर्मी कमांडर यांनी कौतुक केले. देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी तिन्ही सेवादलांमध्ये  सहकार्याच्या वातावरणात सज्जतेची  तयारी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी सर्व विभागांना केले.

हे देखील वाचा :

१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.