Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गेल्या ५० वर्षात चंद्रपुरात प्रथमच मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ३१ मार्च : चंद्रपूरचा पारा आजही चढताच राहिला आहे. आज चंद्रपुरात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या ५० वर्षात मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.

मार्च महिना संपण्याच्या आधीच दोन उष्णतेच्या लाटा धडकल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे.  दुपारच्या वेळेस चंद्रपुरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आता याच काळात महिनाभरासाठी शाळा सुरू होणार असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.