Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिव्यांगांसाठी सामाजिक बांधिलकीतून काम करावे – खासदार, सुप्रियाताई सुळे

दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली , दि.०७ जून : दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासोबत जन्मताच आलेली विविध आव्हाने आपण सर्व जवळून पाहत आलोय. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनीच सामाजिक बांधिलकीतून काम करावे असे आवाहन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा प्रशासन आणि विविध अशासकीय संस्था यांनी मिळून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना निशुल्क दिव्यांग साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे काम केले जात आहे. यापूर्वी दिव्यांगांना फक्त ५ प्रकारच्या नॉर्म नुसार निवडले जायचे परंतु आता २१ प्रकारचे नॉर्म असल्याने मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत झाली आहे. मित्रा संस्था नागपूर व गडचिरोली प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील २१४ कर्णबधिर व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यापैकी १९१ पात्र बालकांची अत्याधुनिक डिजिटल कर्ण यंत्र निशुल्क देण्याकरिता निवड करण्यात आली. त्याचे वाटप आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र वासेकर, सुरेखताई ठाकरे, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम व इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अली यावर जंग नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हीयरींग मुंबई, जिल्हा प्रशासन आणि मित्रा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अली यावर जंग नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हीयरींग मुंबई या संस्थेने पहिल्या टप्प्यात अंदाजे 10 लक्ष रुपये किंमतीचे 80 जणांना अत्याधुनिक कर्ण यंत्र दिली आहेत. तसेच राज्य शासनाच्या मार्फत सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांना युडी आयडी प्रमाणपत्र पण देण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुका स्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे तसेच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या प्रक्रियेसाठीचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मित्रा संस्थेचे दिनेश मासोदकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पुसाम, पंकज खानझोडे, प्रवीण राठोड, निलेश झटाळे, राकेश तिहाडे , सुंदकुमार, नीलिमा हारगुडे, अबोली उबाळे, टिना, शेंडे मदत केली.

गडचिरोली जिल्हा अप्रतिमच – खासदार सुप्रियाताई सुळे

गडचिरोली जिल्ह्याची नेहमी ओळख मागास जिल्हा म्हणून, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून तसेच आकांक्षित जिल्हा म्हणून करून दिली जाते. खरं तर गडचिरोली जिल्ह्याची अशी ओळख पूर्वी होती ही स्थिती आज निर्माण झाली आहे. कारण मोठ्या प्रमाणात गडचिरोलीत विकास कामे पूर्ण झाली आहेत तसेच काही सुरु आहेत. नक्षलवाद आणि मागासलेपणा असलेला जिल्हा या चौकटीतून आता आपण बाहेर पडायला हवे असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे, या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे, गडचिरोली जिल्ह्याने कुपोषणामध्ये राज्यात उत्कृष्टरित्या काम केले आहे. येथील पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यात नव्हे देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

जिल्ह्यात रस्ते चांगले झालेत, पूल झालेत त्यामुळे गडचिरोली जिल्हा मागास आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महसूल विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषद यांनी केलेल्या विविध कामांचे उदाहरणे देऊन सर्व जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. निसर्गसंपन्न अप्रतिम गडचिरोली जिल्ह्यात मी स्वतः वर्षातून एकदातरी येणारच आहे तसेच इतरांनाही मी गडचिरोली जिल्ह्यात वारंवार भेटी देण्याच्या सूचना करणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनाच्या समन्वयाने दिव्यांगासाठी विविध पुनर्वसनात्मक उपक्रमांसाठी समनव्य साधून काम करण्यात येईल असेही या वेळी सांगितले.

हे देखील वाचा : 

भारताच्या संसद भवन साठी वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून दर्जेदार सागवान इमारत लाकूड खरेदी

श्रमजीवीने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘पोस्टमार्टेम’

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.