Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! भरधाव दुचाकीचे झाडाला जोरदार धडक, धडकेत एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी

आलापल्ली पासून ४ किमी अंतरावर मद्दीगुडम गावाजवळील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. २६ मे :  आलापल्ली पासून ४ किमी अंतरावर मद्दीगुडम गावाजवळ आलापल्ली वरून एटापल्ली ला जाणाऱ्या भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटून झाडाला दिलेल्या धडकेत एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, आलापल्ली वरून एटापल्ली येथील महाविद्यालयात बी.एस.सी प्रथम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी अश्रफ शेख रा. अहेरी व यश करमे रा. आलापल्ली हे दोन युवक केटीएम रा.सी.या स्पोर्ट्स बाइक क्र.एम.एच.४९ बीएल ४४४१ ने जात असतांना मद्दीगुडम गावांनंतर च्या वळणावर भरधाव वेगात असलेली दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सरळ रोडलगतच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही युवक गंभीर जखमी झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मार्गावर प्रवास करणाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी जखमी युवकांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले मात्र, गंभीर दुखापत झाल्याने अशर्फ शेख याचा उपचाराअंती उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर गंभीर जखमीयश करमे याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी

पावसाळयापूर्वी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार खुले

लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा Video व्हायरल

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.