Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू ही हत्याच; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल!

मृतक मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांचे देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पारडी गाठत केले सांत्वन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : पारडी येथे पोलीसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांगाचा मृत्यू झाला. या मारहाणीच्या प्रत्यक्षदर्शीनी काढलेले विडीयो व्हायरल झाल्यानंतर उपराजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. ही मारहाण अमानूष असून दोषी पोलिसांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पारडी गाठत ठवकर यांचे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्याची हमीही त्यांनी ठवकर कुटुंबियांना दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले, एखाद्या व्यक्तीला मास्क नाही वापरला म्हणून अशाप्रकारे मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. केवळ दंडाची तरतूद असताना मरेपर्यंत मारणे व यात त्या व्यक्तीचा मृत्यू ही हत्या नाही तर काय आहे. अशा परिस्थितीत संबंधित पोलीस कर्मचा-यांना तातडीने निलंबनाचा कायदा आहे. परंतु पोलीस आयुक्तांनी केवळ बदली करून थातुरमातुर कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाजपातर्फे दोन लाखांची मदत

या प्रकरणी चौकशी होईल, कारवाई होईल. हा भाग वेगळा परंतु ठवकर परिवारावर जे संकट आले त्यांना वेळीच मदत मिळणे आवश्यक आहे. तोपर्यंत भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर च्या वतीने 2 लाखांची मदत देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.