Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २८ फेब्रुवारी : राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील.

संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांचं प्रमुखपद भूषवलं होतं. याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याआधी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तांचे पद होतं. परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानं नगराळे यांच्याकडं मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांच्या बद्दल माहिती 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाईमुळे पांडे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, परंतु तो स्वीकारला नाही. त्यांनी राजानीमा परत घेतला, मात्र त्यावेळेपासून पांडे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला होता.

दरम्यान, राज्य सरकारने संजय पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर, हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे.

हे देखील वाचा : 

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.