Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले )येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ब्रह्मपुरी, दि. २० जून : नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. नागपुर बोर्डाच्या निकालात महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले ) या शाळेचा निकाल पहिल्यांदाच  ९५.६५ टक्के लागला असून सदर परिक्षेला ६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले, त्यापैकी ६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. आणि पहिल्यांदाच इतिहास रचत विद्यालयातुन प्रथम कु. नूतन सुधिर गायधने  ९२.२०% व्दितीय कु.रिंकू दिगांबर बनकर ९१.००%
तृतीय कु.जानव्ही सुधाकर मेश्राम ९०.००% या तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता प्राप्त करून शाळा आणि पिंपळगाव यांच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवला.

या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम विद्यालयाच्या वतीने घेण्यात आला. या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनियुक्त मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे सर हे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्याध्यापक बगमारे सर यांनी प्रावीण्यासह गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर अमरदीप लोखंडे महाराष्ट्र विद्यालय आवळगाव यांनी नव नियुक्त मुख्याध्यापक बगमारे सर यांना मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच गुणवंत प्राप्त विद्यार्थी कुमारी नूतन, कुमारी रिंकू, आणि जानवी यांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महल्ले सर, आर. के. भारती, वाघाडे, प्रवीण शिपाई मधुकर मेश्राम आणि विद्यालयातील प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार घ्यार सर यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

हृदयद्रावक घटना: अंगावर वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

 

Comments are closed.