Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांचे धान चक्क… तहसील कार्यालयात

धान्य विक्रीसाठी गोडाऊन उपलब्ध होणार तहशिलदार कल्यानकुमार दहाट यांचे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना आश्वासन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यातच खरीप हंगामामध्ये खरेदी केलेला माल अद्यापही प्रशासनाने उचल न केल्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्थेला गोडाऊनची कमतरता भासू लागली आहे. दरम्यान धान विक्री करण्याची मुदत फक्त दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांचा घरी पडून आहे.

या बाबीची दखल घेत  गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी चक्क तहसील कार्यालयात आणल्याने तहसीलदार यांनी तोडगा काढत गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये खरेदी केलेला माल शासनाने अद्यापही उचल केला नाही. त्यामुळे गोडाऊन अजूनही भरून आहेत त्यातच यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली होती. त्यातच उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल व मे महिन्यात धान विक्रीसाठी खरेदी-विक्री सहकारी संस्थेकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातच गोडाऊनची कमतरता संस्थेला भासू लागल्याने शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या बाबीची दखल घेत गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयात ट्राक्टर भरुण धान विक्रीसाठी नेऊन तहसीलदार कल्याण कुमार दहाट यांच्याकडे निवेदन देऊन गोडाऊन उपलब्ध करून प्रलंबित दोनशेच्या वरुन शेतकऱ्यांचे धान मुदतीच्या आत खरेदी करण्यात यावी. अशी मागणी केली. दरम्यान तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांनी वरिष्ठांकडे चर्चा करून गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

यावेळी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने,  उपाध्यक्ष लक्ष्मन कानतोडे, व्यावस्थापक अक्षय माकडे, डॉ. संंजय ठेगरे, ग्रेडर गोपाल ककटवार, अक्षय भोयर, राजु घोडाम, कार्तिक मातेरे, पुरुषोत्तम मैन्द, मच्छिद्र मेश्राम, देवराव ठाकरे, कातीलाल वझाडे, ‌चंंद्रभान अक्षय गरफडे, निबेकर, अशोक गोहणे, बाजीराव सयाम, गिरीधर घोडाम यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.