Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू…

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड वनपरिक्षेत्रातील घोडाझरी परिसरातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २८ फेब्रुवारी : नागभीड वनपरिक्षेत्रात  येत असलेल्या घोडाझरी जंगल परिसरातील हुमा नियत क्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाल्याचे वनकर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. मृत वाघाच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याने दोन वाघाच्या वर्चस्वाच्या लढाईत एका वयस्कर वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज प्राथमिकदृष्ट्या वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागभिड वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या किटाली बो येथील बोकरादोह नाल्याजवळ कक्ष क्रमांक ५८२ मध्ये वनकर्मचारी सकाळी गस्त घालीत असताना पट्टेदार वाघ झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. वनकर्मचाऱ्यांनी लागलीच याची सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड यांना दिली. लागलीच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पशुवैद्यकीय पथकाने वाघाचे मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेचा पंचनामा करून वाघाचे शवविच्छेदन डॉ. गभने, रामटेके यांनी केले.

यावेळी वन विभागाचे उप वनसंरक्षक दीपेश मलोत्रा, सहाय्यक वनसंरक्षक वाकडे, ब्रम्हपुरी वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड, झेप निसर्ग संस्था नागभीड, इको प्रो प्रतिनिधी चंद्रपूर घटनास्थळी उपस्थित होते. शेवटी मृत पट्टेदार वाघाला अग्नी देऊन गट क्रमांक ५८२ मध्ये जाळण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.