Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लक्ष्मीपूजन कि कर्जलक्ष्मीपुजन ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

– गंगाधर मुटे आर्वीकर.

आपल्या हाती असलेला पैसा आपला केव्हा असतो ?
जेव्हा सर्व देणे देऊन झाले, कर्ज चुकता करून झाले, दुकानांची उधारी फेडून झाली..म्हणजे सर्व देणे देऊन झाल्यानंतर जो उरते तो पैसा आपला असतो. तो पैसा आपल्या मालकीचा असतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्याचे निव्वळ शेतीवर पोट आहे आणि व्यवसाय केवळ शेतीच आहे, दुसरा अन्य कोणताच व्यवसाय नाही (रात्री चोरी व दिवसा उचलेगिरी करण्याचीही ज्याला सवय नाही) …. अशा ओरिजिनल शेतकऱ्याचा विचार केला तर माझा दावा आहे कि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९५ टक्के शेतकऱ्याकडे स्वतःची लक्ष्मी नसतेच. आणि ते कर्जाच्या लक्ष्मीची पूजा करतात.

व्यापारी खातेवहीची पूजा करतात कारण खातेवहीच्या पानावर देणे आणि घेणे लिहिले असते. त्या देण्या-घेण्याची गोळाबेरीज केली तर त्या वहित शिलकी रक्कम असते आणि ती शिलकी रक्कम त्याच्या स्वतःच्या मालकीची असते. त्यांचे लक्ष्मीपूजन शुभ-लाभदायक असू शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भिकाऱ्याकडे बाकी काहीच नसते, केवळ एक ताटली व झोळी असते पण ती सुद्धा त्याच्या मालकीची असते.

शेतकऱ्याचे मुद्देमालासह शेत आणि भांडीकुंडीसहित घर बँकेला किंवा सावकाराला गहाण असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचे काय असते?

जो पैसा आपला नाही, दुसऱ्याचा कुणाचा तरी आहे…. त्या पैशाची पूजा करणे म्हणजे लक्ष्मीपूजन करणे नसून कर्जपुजन करण्यासारखे आहे.

लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरी येते…. हे जर खरे असेल तर कर्जाची पूजा केली तर कर्ज प्रसन्न होऊन पुन्हा आपल्या घरी कर्जच येईल ना?

कळतंय का? कळलंय तर पटतंय का? नसेल पटलं तर विचार करावा. दररोज झोपलेच पाहिजे असे आवश्यक नसल्याने झोपमोड करून तुमचा तुम्ही विचार करायला हरकत नाही.

 

हे देखील वाचा :

तुम्हाला खरंच देश वाचवायचा आहे का ? – फक्त एवढं करा !

केवळ ‘लिव्ह इन’ रेलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार!

Comments are closed.