Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

धुंदलवाडी, दि. १० जानेवारीपालघर जिल्ह्यातील पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे (A.R.T. Centre) आज धुंदलवाडी येथे राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री. विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाट करण्यात आले. डहाणू तालुक्यातल्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे A.R.T. Centre ची स्थापना रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. “हे केंद्र म्हणजे पालघर जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी नवे आशेचे किरण असून, त्यांना उपचारासाठी ठाण्याला जाण्याची फरपट थांबणार आहे.” असे मत श्री विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यात एकूण १९०० एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. आदिवासी दुर्गम भागातील लोकांना प्रत्येक वेळेस ठाणे येथे उपचारासाठी जावे लागते. धुंदल वाडी येथील हे एआरटी सेंटर जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी चांगली सोय आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजाराविषयी माहिती न लपवता समोर यावं आणि या केंद्रात उपचार करून घ्यावा असे आवाहन या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी श्री विवेक पंडित यांनी केले. तसेच, वेदांता रुग्णालयाने हे सेंटर सुरू केले त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने पंडित यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालघर जिल्ह्यातील रुग्णांना ठाण्याला जाण्यासाठी होणारी दगदग होते, त्यामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत होते. रुग्णांची गैरसोय ओळखून, त्यांना एचआयव्ही बाधित रुग्णांना जिल्ह्यामध्येच उपचार मिळावे या हेतू रुग्णालय प्रशासनाने ए. आर. टी. सेंटर अर्थात Antiretroviral Therapy केंद्र (एआरटी सेंटर) सुरू केल्याचे रुग्णालयाचे असिटेंट मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अमोल घुले आणि वेदांता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेसचे एडमिनिस्ट्रेटिव मेडिकल ऑफिसर डॉ. मुकुंद खंडेलवाल यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एआरटी सेंटरचे वैशिष्ट्य

१) सदर एआरटी सेंटरला रुग्णाची नोंदणी, डॉक्टर मार्फत तपासणी, समुपदेशन, वैद्यकीय तपासण्या व औषध गोळ्या घेणे ही सर्व कामे एकाच ठिकाणी होतील.

२) रुग्णाला सर्व उपचार मोफत मिळतील त्याला इतरत्र जाण्याची गरज लागणार आहे. रुग्णाने केवळ एआरटी सेंटर शी संपर्क साधावा.

३) एआरटी सेंटर मध्ये तज्ज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी व डॉक्टर कार्यरत असून वरिष्ठांच्या संपर्कात राहून ए आर टी सेंटर रुग्णसेवेसाठी नेहमीच तत्पर असेल.

ए आर टी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पालघरचे जिल्हा शल्य चकीत्सक डॉ विजय काळभांडे, ठाण्याचे रतन गाढवे, वाय आर जी केअर चे समन्वयक डॉ. दुर्गा कांथिकिरान व डॉ. संगीता मोरे यांच्यासह श्रमजीवी संघटनचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेश भाऊ रेंजड, जिल्हा सरचिटणीस व जिल्हापरिषद सदस्य श्री गणेश उंबरसाडा, उपाध्यक्ष रामचंद्र रोज, नरेश वराठा, जव्हार येथील बाल संजीवन छावणी प्रमुख सिता घाटाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

 

 

Comments are closed.