Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा Video व्हायरल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सोलापूर, दि. २४ मे : सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात १० एकर बागायत असलेल्या शेतकऱ्याने लिंबू विकत विकत आपली व्यथाच सांगितली. “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवाराला फोन”, असं म्हणत हा शेतकरी ग्राहकांचं लक्ष वेधताना व्हिडीओत दिसत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या व्हिडीओत लिंबू विक्रेता शेतकरी “१० एकर बागायत हाय, पण पोराला पोरगी कोणी देईना” असंही सांगताना दिसत आहे. हा शेतकरी वैरागच्या बाजारात लिंबू विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्याचे अद्याप नाव समजलेले नाही, मात्र हा शेतकरी वैराग परिसरातीलच असल्याचं समोर आलंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकूणच शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत तुटपुंजा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी हवालदील आहेत. दुसरीकडे महागाईचा आगडोंब वाढला आहे. अशात शेतकऱ्याला दैनंदिन उदरनिर्वाह करणं कठीण होत आहे. अशातच मुलांचं शिक्षण, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांनी घेरलेल्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळेच राज्यासह देशात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर शेतकरी आपले प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ देखील त्याच अभिव्यक्तीचा प्रकार असल्याचं बोललं जातंय.

केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्या शेतीविषयक समजेचं राजकीय वर्तुळातून अनेकदा कौतुक होतं. दुसरीकडे वयाच्या या टप्प्यावरही शरद प वार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीप्रश्न समजून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांना वेगळं स्थान आहे. व्हायरल व्हिडीओतील शेतकरी देखील शरद पवार यांचा उल्लेख करत शेतमालाच्या विक्रीचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा शेतकऱ्यांमधील प्रभावही यातून दिसतो.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

रवीची ‘सोशल’ इंजिनिअरिंग !

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.